breaking-newsआंतरराष्टीय

कॅनडातील भारतीय रेस्टॉरन्टमध्ये स्फोट, १५ जण जखमी

टोरंटो : कॅनडातील ओंटारियो येथील एका भारतीय रेस्टॉरन्टमध्ये स्फोट झाला. या स्फोटात १५ जण जखमी झाले असून यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे. या स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ओंटारियो येथे बॉम्ब भेल हे रेस्टॉरन्ट असून या रेस्टॉरन्टमध्ये गुरुवारी स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. स्फोटाच्या आवाजाने परिसर हादरुन गेला. हा दहशतवादी हल्ला आहे का, याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटाच्या काही वेळापूर्वी रेस्टॉरन्टमध्ये दोन तरुण संशयास्पद स्थितीत घुसले होते. त्या दोघांनी कापडाने चेहरा झाकला होता.

Peel Paramedics

@Peel_Paramedics

@Peel_Paramedics have transported 15 pts. from The Bombay Bhel restaurant in Mississauga. 3 pts. were taken to trauma centres with critical blast injuries.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button