breaking-newsआंतरराष्टीय

कुवेतमध्ये अदनानसह टीमला अपमानास्पद वागणूक; स्टाफला ‘भारतीय कुत्रे’ संबोधले

बलिवूडचा प्रसिद्ध गायक अदनान सामी आणि त्याच्या सहकाऱ्यांना कुवेतमध्ये अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचे समोर आले आहे. अदनानच्या टीमला भारतीय कुत्रे म्हणून हिणवल्याचा निंदास्पद प्रकार घडला आहे. अदनान सामी आणि त्याचे सहकारी एका कार्यक्रमासाठी कुवेतला गेले होते. रविवारी रात्री हे सर्व जण विमानतळावर उतरले, तेव्हा कुवेतमधील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना ‘इंडियन डॉग्ज’ म्हणजे भारतीय कुत्रे म्हणून चिडवले. अदनान सामीने ट्विटरच्या माध्यमातून हा आरोप केला आहे.

‘आम्ही तुमच्या शहरात प्रेम घेऊन आलो होतो. आमच्या भारतीयांनी आम्हाला सन्मानाची वागणूक दिली, मात्र तुम्ही कोणताही पाठिंबा दिला नाहीत. कुवेत विमानतळावरील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी विनाकारण माझ्या स्टाफला तुच्छ लेखले आणि भारतीय कुत्रे म्हणून डिवचले. भारतीय दूतावासाशी संपर्क करुनही काही फायदा झाला नाही. कुवेतींची इतक्या उद्धटपणे वागण्याची हिंमतच कशी झाली?’ असा संताप अदनानने ट्वीटमधून व्यक्त केला आहे.

स्थानिक भारतीय दूतावासाशी संपर्क साधूनही काहीही मदत न मिळाल्याचा दावा अदनानने केला आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अदनानच्या तक्रारीची दखल घेत आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. यानंतर काही वेळातच अदनानने आपल्याला मदत मिळाल्याचे सांगत स्वराज यांचे आभार मानले.

View image on TwitterView image on TwitterView image on TwitterView image on Twitter

Adnan Sami

@AdnanSamiLive

@indembkwt We came 2 ur city wt luv & our Indian brethren embraced us with it. U gave no support. Kuwaiti airport immigration mistreated my staff 4 no reason & called thm ‘Indian Dogs’! Wn u wr contacted u did nothing!! How dare d Kuwaitis behave like this with arrogance?!

Adnan Sami

@AdnanSamiLive

Thank you so much for your concern my dear. @SushmaSwaraj is a lady full of heart & she is in touch with me & is looking after our people.. I’m so proud that she is our foreign minister & looks after us all over the world. https://twitter.com/kirenrijiju/status/993182951960596486 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button