breaking-newsराष्ट्रिय

कुल्लू बस अपघात: मृतांचा आकडा ४४ वर

हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यात बंजार भागात गुरुवारी खासगी प्रवासी बसला झालेल्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा ४४ वर पोहचला आहे. घाट मार्गातून जाताना ही बस ५०० फूट खोल दरीत कोसळली. या बसमध्ये ७० ते ७५ प्रवासी होते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यापैकी ४४ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ३० प्रवासी जखमी झाले आहेत.

बंजारहून गादागुशानी येथे जाणाऱ्या या बसमध्ये बहुतांशी प्रवासी हे विद्यार्थी होते. ते कॉलेजमध्ये अॅडमिशन घेऊन घरी परत जात होते अशी माहिती समोर आली आहे. बंजारापासून एक किलोमीटर दूरवर असलेल्या भियोठ येथील एका अवघड वळणावर ही बस दरीमध्ये कोसळली. दरीत कोसळताच बसचा चक्काचूर झाला. काल संध्याकाळपर्यंत ३३ जणांचा मृत्यू झाल्याच्या माहितीला जिल्हाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला होता. मात्र रात्री उशीरापर्यंत मृतांचा आकडा ४४ वर पोहचला असून सर्व जखमींना बंजार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या भीषण अपघाताबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही ट्विटवरुन दु:ख व्यक्त केले आहे. ‘कुल्लू, हिमाचल प्रदेशमधील बस दुर्घटनेमुळे अतिशय दु:ख झाले आहे. मृतांच्या कुटुंबीयांच मी सांत्वन करतो. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो,’ असे ट्विट कोविंद यांनी केले आहे.

President of India

@rashtrapatibhvn

कुल्लू, हिमाचल प्रदेश में हुई बस दुर्घटना के बारे में जानकर बहुत दुख हुआ है। शोक संतप्त परिवारों के प्रति मेरी संवेदनाएँ। मैं घायलों के शीघ्र स्वस्थ होने की कामना करता हूँ — राष्ट्रपति कोविन्द

748 people are talking about this

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यालानेही या घटनेसंदर्भात ट्विट केले होते. ‘कुल्लूमधील बस दुर्घटनेमुळे फार दु:ख झाले आहे. दुर्घटनेमधील मृतांच्या नातेवाईकांचे मी सांत्वन करतो. तसेच जखमींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करतो. हिमाचल प्रदेश सरकारला केंद्राकडून सर्व प्रकारची मदत केली जात आहे,’ असे ट्विट पंतप्रधान कार्यालयाच्या अकाऊण्टवरुन करण्यात आले आहे.

PMO India

@PMOIndia

Deeply saddened by the bus accident in Kullu. Condolences to the families of those who lost their lives. I hope the injured recover soon. The Himachal Pradesh Government is providing all possible assistance that is required: PM @narendramodi

1,792 people are talking about this

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनाही या अपघाताबद्दल ट्विटरवरुन दु:ख व्यक्त केले आहे. ‘हिमाचल प्रदेशच्या कुल्लूमधील बस दुर्घटना दु:खद आहे. मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबाच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो. तसेच या प्रदेशामधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी अपघाग्रस्तांना मदत करवी अशी विनंती करतो’, असे ट्विट राहुल गांधींनी केले आहे.

Rahul Gandhi

@RahulGandhi

हिमाचल प्रदेश के कुल्लू में हुई बस दुर्घटना दुखद हैं ।इस दुर्घटना में मारे गए लोगों के परिवारों के प्रति मेरी गहरी संवेदना और घायलों के जल्द स्वस्थ होने की कामना करता हूं । मैं इस क्षेत्र के कांग्रेस पार्टी के कार्यकर्ताओं से पीड़ितों की मदद करने का अनुरोध करता हूं। https://twitter.com/httweets/status/1141690224205914113 

Hindustan Times

@htTweets

25 dead, 35 injured as bus falls in gorge in Kullu district of Himachal Pradeshhttps://www.hindustantimes.com/india-news/25-dead-35-injured-as-bus-falls-in-gorge-in-kullu-district-of-himachal-pradesh/story-6MuQqD8lRWGFXmYPlYQlbN.html 

View image on Twitter
3,787 people are talking about this

राष्ट्रपती, पंतप्रधान, काँग्रेस अध्यक्षांबरोबर उप-राष्ट्रपती आणि इतर नेत्यांनाही या घटनेबद्दल ट्विटवरुन दु:ख व्यक्त केले आहे. तर हिमाचलचे मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दुर्घटनाग्रस्त बसमधील बहुतांश प्रवासी हे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या सराज विधानसभा क्षेत्रामधील आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button