breaking-newsराष्ट्रिय

कुमारस्वामींच्या शपथविधीला शरद पवार उपस्थित राहणार

बंगळूरू :  जनता दल सेक्युलरचे (जेडीएस) नेते एच. डी. कुमारस्वामी बुधवारी २३ मे रोजी कर्नाटकच्या  मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. भाजपाला एकजुटीचा इशारा देण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे. त्यामुळेच कुमारस्वामी जेव्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, तेव्हा विरोधी पक्ष जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत.

कुमारस्वामींच्या शपथविधीला विरोधकांचे शक्तिप्रदर्शन

मायावतीही बुधवारी शपथविधीला सोहळ्याला येणार आहेत. कुमारस्वामी यांनी मार्क्सवादी तसेच भाकपा नेत्यांनाही निमंत्रण दिले. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन, सीताराम येचुरी हेही नेते शपथविधीला हजर राहतील, असे सांगण्यात येते. बाकी सर्व विरोधी पक्षांचे बडे नेतेही येणार असल्याने शपथविधीला विरोधकांचे शक्तिप्रदर्शनच मानले जात आहे.

दरम्यान, कर्नाटकात काँग्रेस व जनता दलाचे संयुक्त सरकार बनवण्यासाठीचा मसुदा तयार झाला असून, त्यांसंदर्भात भावी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी सोमवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व सोनिया गांधी यांची भेट घेतली. हे दोन्ही नेते बुधवारी संध्याकाळी ४ वाजता बंगळुरूमध्ये होणाऱ्या शपथविधीला हजर राहणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button