breaking-newsराष्ट्रिय

कुपवाडात चार गनिम ठार…

श्रीनगर – भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ताबारेषेतून कुपवाडा जिल्ह्यात भारतीय हद्दीत गनिम घुसवण्याचा एक प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला आहे. यावेळी भारतीय जवानांनी केलेल्या गोळीबारात चार घुसखोर गनिम ठार झाल्याची माहिती संरक्षण सूत्रांनी दिली.

कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले की तंगधर सेक्‍टर मधून भारतीय हद्दीत गनिम घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तेथील ऑपरेशन दुपारी उशिरापर्यंत सुरू होते. भारतीय जवानांनी गोळीबार सुरू केल्यानंतर बाकीचे गनिम पाकिस्तानी हद्दीत परत गेले. त्यांची संख्या नेमकी किती होती ते समजू शकलेले नाहीं. मृत गनिमांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे असेही त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button