breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कुदळवाडी येथे दिनेश यादव यांच्या पुढाकाराने आरोग्य जनजागृती

पिंपरी । प्रतिनिधी
कुदळवाडी येथे स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांच्या पुढाकाराने आरोग्य जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला आणि “माझे आरोग्य माझी जबाबदारी” याचा साक्षात अनुभव यादरम्यान आला.

वाचा :-आगीच्या धूरात अडकलेल्या आठ रहिवाशांची अग्नीशामक जवानांकडून सुटका

क्षयरोग निर्मूलनाच्या दृष्टीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आणि या शिबिरात क्षयरोग रुग्ण शोधणे आणि त्याचे निराकरण करणे यावर अधिक भर देण्यात आला होता.पालिका क्षयरोग निर्मूलन अधिकारी होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा आकुर्डी आणि यमुनानगर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या शिबिरात सहभाग घेऊन नागरिकांच्या तपासण्या आणि उपाययोजना याबाबत नागरिकांचे समुपदेशन केले.यावेळी सर्वेक्षण आणि पुढील काळात करावयाच्या उपाययोजना याबाबत चर्चा करून रूपरेखा ठरविण्यात आली.परिसरातील अनेक नागरिकांनी या मोहिमेत सहभाग नोंदविला आणि तपासण्या करून घेत या उपक्रमाला यशस्वी केल्याची माहिती दिनेश यादव यांनी दिली आहे.

या जनजागृती मोहिमेतून नागरिकांच्या आरोग्य समस्यांबाबत मनपा आणि स्थानिक सदस्य दिनेश यादव यांच्या कर्तव्य परायणतेबाबत नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.कुदळवाडी भागात आरोग्य यंत्रणांचे जाळे म्हणावे तसे पसरलेले नाही आणि अशा मोहिमांमध्ये नागरिकांचा सहभाग हा या भागातील सुदृढ आरोग्यासाठी आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून यावेळी देण्यात आली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका माननीय शहर क्षयरोग रोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर होडगर सर व डॉक्टर ढोणे मॅडम तसेच यमुनानगर टी यु चा डॉक्टर भोईर मॅडम तसेच आकुर्डी हॉस्पिटलच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर साळवे मॅडम तसेच श्री शेखर सरोदे (एसटीएस) व श्री प्रल्हाद जाधव (टी बी एच व्ही) यांच्या मार्गदर्शनाखाली कुदळवाडी परिसरामध्ये क्षयरोग जनजागृती व प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहीम सर्व NTEP कर्मचारी व JEET कर्मचारी यांच्यावतीने सर्वेक्षण करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button