breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कुख्यात डॉन अरुण गवळीची पुन्हा पॅरोलसाठी मागणी…

कुख्यात डॉन अरुण गवळीने पुन्हा एकदा पॅरोलची मागणी केली आहे. पत्नी आजारी असल्याच्या कारणास्तव गवळीने 30 दिवसांची पॅरोल रजा मागितली आहे. अरुण गवळी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

नागपूर विभागीय आयुक्तांनी अर्ज फेटाळल्यानंतर पॅरोलसाठी अरुण गवळीने उच्च न्यायालयात याचिका केली. न्यायालयाने राज्य सरकारला दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अरुण गवळी शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

याआधी, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर केली होती. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचा टप्पा पार पडल्यानंतर, म्हणजेच 30 एप्रिल 2019 रोजी गवळी पॅरोलवर मुंबईत आला होता.

अरुण गवळी याआधीही 3 ते 4 वेळा जेलबाहेर आला आहे. मुलाचं लग्न, आजारपण अशी कारणं देत अरुण गवळी जेलबाहेर आला होता. आता पॅरोल मंजूर झाल्यास पुन्हा अरुण गवळीला तुरुंगाबाहेर येण्याची संधी मिळणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button