breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कीटकांनी घडविले अपघात, सांगलीच्या अंकली पुलावरील घटना

सांगली – अंकली (ता. मिरज) येथील कृष्णा नदीपुलावर गेल्या दोन दिवसांपासून शेमटी (मेप्लाय) किटकांच्या झुंडीच्या झुंडी वाहनधारकांसमोर येत असल्याने अपघात होत आहेत. मृत कीटकांचा खच पडल्यामुळे पुलाचा रस्ताही निसरडा बनल्याने वाहनधारकांना कसरत करीत ये-जा करावी लागत आहे.

सांगली-कोल्हापूर रोडवरील अंकली पुलावर शुक्रवारी अनेक दुचाकीस्वार घसरून पडल्याने जखमी झाले. याचा व्हिडिओ (चित्रीकरण) आता सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. मेप्लाय हे या कीटकाचे शास्त्रीय नाव असले तरी त्याला मराठीत शेमटी असे म्हटले जाते. नदी, नाले, तलाव अशा पाण्यावर वाढणारे व जन्म घेणारे हे जलीय किटक असतात. एकावेळी मोठ्या संख्येने म्हणजेच लाखोंच्या संख्येने याच्या झुंडी बाहेर पडतात. अशाच झुंडी आता अंकलीच्या पुलावर गेल्या दोन दिवसांपासून पहावयास मिळत आहेत.

शुक्रवारी या कीटकांनी अनेक अपघात घडविले. मृत कीटकांचे खच रस्त्यावर पडले होते. त्यांमुळे रस्ते निसरडे होऊन वाहने घसरत होती. मोठ्या वाहनांच्या काचाही या कीटकांनी आच्छादल्या होत्या. त्यामुळे अत्यंत मंदगतीने वाहने या पुलावर मार्गक्रमण करीत होती. त्यामुळे दुचाकीस्वार घसरूनही त्यांच्या जीवावर बेतले नाही. अन्य वाहने गतीने जात असती तर कदाचित याठिकाणी अपघातात अनेकांना जीव गमवावे लागले असते.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button