breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

किशोरवयीन मुलांच्या पालकांसाठी आता टिन टॉक्स ‘अॅप’

पिंपरी / महाईन्यूज

सध्याच्या काळात किशोरवयीन मुलांमुलींचा प्रश्र हा त्यांच्या पालकांसाठी अतिशय महत्वाचा असून पालकांना मुलांच्या समस्या, त्यांच्या मानसिकतेला सामोरे जावे लागत आहे. याकरीता उपयुक्त ठरणारे “टिन टॉक्स” हे अॅप स्टेप अप फांउडेशनने विकसीत केले असून त्याचा उपयोग शहरातील पालकांसाठी निश्चितच चांगल्या प्रकारे होईल असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.

मुले-मुली वयात येताना त्यांना लैंगिकता, व्यसन, शोषण आदीबाबत संकोच वाटत असतो त्यासाठी स्टेप अप फांउडेशन यांनी विकसीत केलेल्या अॅपचे उद्घाटन महापालिकेच्या महापौर कक्षात महापौर माई ढोरे यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, नगरसदस्य मोरेश्वर शेडगे, नगरसदस्या अश्विनी चिंचवडे, शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी पराग मुंढे, स्टेप अप फाऊंडेशनच्या अध्यक्षा गौरी वैद, विश्वस्त राधिका गांगल, डॉ. शिशिर जोशी, निधी साने, डॉ. श्वेता जोशी आदी उरस्थित होते. तसेच हा प्रकल्प सीएसआर उपक्रमांतर्गत अथेना हेल्थ टेक्नोलॉजी प्रा. लिमिटेड या कंपनीतर्फे प्रायोजित केला जात आहे त्या कंपनीच्या प्रमुख मंजूश्री राऊत यादेखील उपस्थित होत्या.

संस्थेच्या अध्यक्षा गौरी वैद यांनी या उपक्रमाबाबत माहिती सांगितली स्टेप अप फाऊंडेशन ही संस्था गेली १० वर्षे किशोरवयीन मुला मुलींचा अभ्यास करीत असून त्यावर परीक्षण करीत आहे. संस्थेचा “किशोरवयीन आरोग्य “ हा प्रमुख विषय आहे. मुलं वयात येताना त्यांच्यामधे अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होतात. त्यामुळे त्यांचं वागणं बोलणं,सवयी सगळ्यातच बदल प्रकर्षाने जाणवतात. त्याचबरोबर मुलांना या वयात अनेक प्रश्न पडत असतात लहान असताना मुलं हे प्रश्न आपल्या पालकांना विचारतात पण पोगंडावस्थेत पालकांना मुलांना हाताळणं अवघड जातं किंवा बऱ्याचदा या प्रश्नांची उत्तरं देताना अवघडल्यासारखं ही होतं आणि मग मुलं याची उत्तरं इंटरनेट वर किंवा मित्र-मैत्रिणीकडून मिळवतात.

सध्या कोरोनाच्या परिस्थितीत मुलं पूर्ण वेळ घरात आहेत. त्यामुळे त्यांच्या शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्यावर ही दुष्परिणाम झालेला दिसत आहे. ज्यामुळे सतत कंटाळा येणं, चिडचिडेपणा वाढणं, बऱ्याचदा उदास वाटणं, पालकांबरोबर सतत वादविवाद होणं असे परिणाम दिसून येतात. त्याचबरोबर सध्याच्या परिस्थितीत सगळ्याच गोष्टी ऑनलाईन सुरू आहेत त्यामुळे मुलांना आधीपेक्षा जास्त इंटरनेट सारखे माध्यम मिळाले आहे, त्यामुळे वाईट फिल्मस् पाहणं, त्याविषयी मित्र-मैत्रिणींबरोबर चर्चा करणं त्यातून चुकीची माहिती मिळणं याचा धोका ही वाढतो आहे. शिवाय मित्रांकडून मिळालेली ही माहिती ब-याचदा अर्धवट आणि चुकीची ही असू शकते.

ज्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून पालकांनीच योग्य वयात मुलांना योग्य माहिती द्यावी, त्यांनीच सक्षम व्हावं, पालक आणि मुलांमध्ये मोकळा संवाद सुरू व्हावा, पालकांना आणि शिक्षकांना मुलांना हाताळणं सोपं जावं यासाठी संस्थेने टीन टॉक्स या अॅप ची निर्मिती केली आहे. या अॅपची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे यामध्ये सोप्या भाषेत किशोरवयीन मुलांविषयीचे शैक्षणिक व्हिडिओ आहेत जे मुलांना त्यांच्या वयानुसार टप्प्याटप्याने दाखवायला काहीच हरकत नाही. या अॅपद्वारे मुलं, पालक व शिक्षक वा इतर कोणीही किशोरवयीन मुलांसंदर्भात मोफत समुपदेशन घेऊ शकतात. याचबरोबर मोफत प्राथमिक शिक्षण सुध्दा मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत अॅपद्वारे दिले जाणार आहे. या अॅपचा शहरातील पालकांनी व मुला मुलींनी वापर करावा असे आवाहन महापौर माई ढोरे यांनी सर्वांना केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button