breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘काॅर्पोरेट सोशल रिसपाॅन्सिबिलिटी’ धोरणासाठी महापालिका नेमणार सल्लागार

पिंपरी – महापालिकेतर्फे ‘काॅर्पोरेट सोशल रिसपाॅन्सिबिलिटी’ सीएसआर धोरण राबविण्यात येणार आहे. यासाठी सहा महिने कालावधीकरिता 70 हजार प्रतिमहिना मानधनावर ‘सीएसआर एक्‍सपर्ट’ सल्लागाराची निवड करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी (दि.6) होणा-या स्थायी समिती समोर मान्यतेसाठी ठेवला आहे.

केंद्र सरकारच्या धोरणानुसार पिंपरी महापालिकेत ‘सीएसआर अॅक्‍टीव्हीटी’ राबविण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 18 नोव्हेंबर 2016 रोजी झालेल्या सभेमध्ये ‘सीएसआर एक्‍सपर्ट’ सल्लागार मानधनावर नेमण्यासाठी निर्णय झाला आहे. तसेच सल्लागाराला प्रतिमहिना 70 हजार प्रतिमहिना मानधन देण्याचे निश्चित करण्यात आले. हे सल्लागार नेमण्यासाठी एमबीए सीएसआर पदविका प्राप्त अथवा एमबीए शिक्षण पूर्ण, ‘सीएसआर’ विषयक अनुभवासह अशी शैक्षणिक अर्हता ठरविण्यात आली होती. त्यानुसार सीएसआर कक्षाकडून जाहिरात मागवून सल्लागार यांची एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरुपात सहा महिन्यासाठी नेमणूक करण्यात आली होती. त्याची मुदत 31 मे 2018 रोजी संपली आहे. त्यामुळे यासाठी नव्याने मानधनावर सल्लागार नेमण्यात येणार आहे.

त्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाकडून ‘रोटेशन’ पद्धतीने जाहिरात देऊन 6 मे पर्यंत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले होते. त्यानुसार 108 उमेदवारांचे अर्ज ई-मेल द्वारे महापालिकेस प्राप्त झाले आहेत. प्राप्त अर्जांपैकी शैक्षणिक अर्हता आणि ‘सीएसआर’ विषयक कामकाजाचा अनुभव या अनुषंगाने 14 उमेदवारांना मुलाखतीला बोलवण्यात आले होते. त्यापैकी सहा जण उपस्थित राहिले. त्यांची 21 मे रोजी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत मुलाखत घेण्यात आली. त्यामध्ये पात्र ठरलेल्या विजय वावरे यांची ‘सीएसआर एक्‍सपर्ट’ सल्लागार पदावर सहा महिने कालावधीकरिता 70 हजार प्रतिमहिना मानधनावर निवड करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समोर ठेवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button