breaking-newsआंतरराष्टीय

काश्मीरमध्ये सीमारेषेजवळ IED स्फोटात एक जवान शहीद, सात जखमी

जम्मू- काश्मीरमध्ये भारत- पाकिस्तान सीमारेषेजवळ आयईडीद्वारे स्फोट घडवण्यात आला असून यात एक जवान शहीद झाला आहे. या स्फोटात सात जवान जखमी झाले असून पूँछ जिल्ह्यातील मेंढर सेक्टर येथे ही घटना घडली आहे.

मेंढर येथे सीमारेषेजवळ बुधवारी दुपारी आयईडीद्वारे स्फोट घडवण्यात आला. या स्फोटात गस्तीवर असलेल्या सुरक्षा दलाच्या पथकातील आठ जवान जखमी झाले. जखमींना तातडीन रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील एका जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सात जवान जखमी झाले आहेत.

ANI

@ANI

Jammu & Kashmir: One security personnel has lost his life and seven injured in IED blast in Mendhar area along the Line of Control in Poonch sector.

७२ लोक याविषयी बोलत आहेत

दरम्यान, बुधवारी सकाळी कुलगाम येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या चकमकीच्या पार्श्वभूमीवर सीमा रेषेजवळ हा स्फोट घडवण्यात आल्याने सुरक्षा दल सतर्क झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button