breaking-newsराष्ट्रिय

काश्मीरमधील ८९ टक्के बागायती जमीन सफरचंद लागवडीखाली

श्रीनगर : काश्मीर हे भारताचे सफरचंदासाठीचे प्रमुख कोठार आहे. येथील जवळपास १४५,८६८ हेक्टर म्हणजेच सुमारे ८९ टक्के बागायती भाग सफरचंदाच्या लागवडीखाली आहे. यातून दरवर्षी सुमारे ९००० कोटी रुपयांची उलाढाल होते.

सन २०१६-१७ मध्ये फळ उत्पादनात जम्मू आणि काश्मीर राज्याने वर्चस्व निर्माण करत १.६३ लाख हेक्टर क्षेत्रातून १७.३ लाख मेट्रिक टन फळांचे उत्पादन घेतले होते.

काश्मीरमध्ये पहिल्यांदा सन १९३० च्या दरम्यान सफरचंदाची लागवड करणे सुरू झाले होते. त्यावेळी फक्त १२,००० हेक्टरवर उत्तर काश्मीरच्या सोपोर भागात याची लागवड करण्यात आली होती. दरम्यान मधल्या आठ दशकांत काश्मीरच्या सकल राज्य उत्पन्नात प्रमुख वाटा म्हणून ही लागवड उदयाला आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button