मनोरंजन

‘काला’ चित्रपटाच्या प्रदर्शन स्थगितीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

सुपरस्टार रजनीकांत यांची भूमिका असलेल्या ‘काला’ या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असून, आता हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्या. आदर्शकुमार गोयल व न्या. अशोक भूषण यांनी चित्रपट निर्माता के. एस. राजशेखरन यांची याचिका फेटाळली.

राजशेखरन यांच्या वकिलाने असा आरोप केला, की या चित्रपटाचे स्वामित्व हक्क आमच्या अशिलाकडे आहेत व निर्मात्यांनी चित्रपट बनवताना आमची परवानगी घेतली नाही. ज्या चित्रपटाची सगळे जण वाट पाहात आहेत त्याच्या प्रदर्शनास स्थगिती द्यावी अशी तुमची अपेक्षा आहे काय, अशी विचारणा करून न्यायालयाने सांगितले, की या चित्रपटाचे प्रदर्शन दोनदा लांबणीवर टाकण्यात आले आहे. वकिलांनी सांगितले, की १६ मे रोजी मद्रास उच्च न्यायालयाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबतची याचिका १६ जूनला सुनावणीसाठी ठेवल्याचे सांगितले. त्यावर न्यायालयाने सांगितले, की चित्रपट प्रदर्शित होऊ द्या.

‘काला’ हा चित्रपट रजनीकांत यांचे जावई अभिनेते धनुष यांनी निर्मिती केलेला असून, वंडरबार फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडच्या या चित्रपटाचे दिग्दर्शक पा. रणजिथ आहेत. हा चित्रपट आधी लांबणीवर टाकण्यात आला होता. आता तो गुरुवारपासून प्रदर्शित होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button