breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कारवाईची बोळवण: तापकीर चौकाला अतिक्रमणाचा विळखा; थेरगाव रस्त्यावरही बेकायदेशीर पार्किंग

पिंपरी – महापालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यक्षेत्रात काळेवाडीतील तापकीर चौकाला अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. याबाबत महापालिकेकडे तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. हे अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने 10 हातगाड्या आणि एक लोखंडी हातगाडी जप्त करून कारवाईची बोळवण केली आहे.

काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता या बीआरटी रस्त्याचे काम रखडले आहे. काळेवाडी फाटा ते तापकीर चौकात बीआरटी मार्गातील रिकाम्या जागेत बेकायदेशीर वाहनतळ झाले आहे. चौकात फुटपाथवर बेकायदेशीर टप-या, हातगाड्या लावल्या जात आहेत. त्यामुळे सायंकाळी आणि सकाळी याठिकाणी वाहतूक कोंडी नित्याचीच बनली आहे. तर, थेरगावकडे जाणा-या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजुला बेकायदेशीर वाहने लावली जात आहेत. कंपन्यांमध्ये कामगारांची वाहतूक करणा-या बसेस लावल्या जात असल्यामुळे रात्री याठिकाणी अश्लिल प्रकारही घडत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. अशा प्रकारांमुळे या भागातील नागरिकांचे सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे.

 

तापकीरनगर आणि थेरगाव वेगवेगळे दोन प्रभाग असल्यामुळे याभागात आठ नगरसेवक आहेत. मात्र, एकाही नगरसेवकाचे या चौकातील अतिक्रमण अथवा वाहतूक कोंडीकडे लक्ष नसते. त्यामुळे नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. शेवटी पालिकेच्या सारथीवर अनेक सुजान नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्याकडेही अधिका-यांनी दुर्लक्ष केले आहे. तक्रारी वाढू लागल्याने शेवटी अतिक्रमण विरोधी पथकातील अधिका-यांनी तापकीर चौकात कारवाईची बोळवण केली आहे. दहा हातगाड्या जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेने कळविली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button