breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा ना संत्री’, गृहमंत्र्यांचे सूचक वक्तव्य

मुंबई – कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री…महाराष्ट्रात कायदा कोणाच्याही बाबतीत भेदभाव करणार नाही, असे सूचक वक्तव्य राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपाच्या प्रकरणावर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

वाचा :-नांदेडला समृद्धी महामार्गाशी जोडणार!, राज्य शासनाचा निर्णय

धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मनसे आणि भाजपच्या नेत्यांनी या महिलेवर ब्लॅकमेलिंग आणि फसवणुकीचा आरोप केल्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे.

मुंडेवर आरोप करणाऱ्या महिलेने आपला जबाब नोंदवला जात नसल्याचे म्हटले होते. याबाबत विचारले असता अनिल देशमुख म्हणाले की, कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री…महाराष्ट्रात कायदा कोणाच्याही बाबतीत भेदभाव करणार नाही. आमचं पोलीस खातं योग्यप्रकारे चौकशी करुन जो कोणी दोषी असेल त्याच्यावर योग्य प्रकारे कारवाई करेल, असे ते म्हणाले.

दरम्यान, मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेवरच इतरांनी आरोप केल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. मुंडे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. पक्षाकडून देखील त्यांना तुर्तास दिलासा मिळाला असून, त्यांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले जाते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button