breaking-newsराष्ट्रिय

कामात गडबड झाली तर बुलडोझरखाली चिरडेन- नितीन गडकरी

भोपाळ : केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी पुन्हा एकदा वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहे. नितीन गडकरी यांनी कत्रांटदारांना दिलेल्या धमकीमुळे ते चर्चेचा विषय ठरले आहेत. बेतुलमधील एका जनसभेत बोलताना नितीन गडकरी यांनी कत्रांटदारांना धमकी दिल्याचे सांगितले. ‘काम योग्य झाले नाही किंवा कामात काही गडबड झाली तर मातीऐवजी तुम्हाला बुलडोझर खाली चिरडेन’, अशी धमकी कत्रांटदारांना दिल्याचे स्वतः नितीन गडकरी यांनी म्हटले.

नितीन गडकरी यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. ‘ इथे जितके कंत्राटदार काम करतात त्यापैकी एकही दिल्लीहून आलेला नाही. एकाही रुपयाचा भ्रष्टाचार नाही. या रस्त्यांचे मालक तुम्ही आहात. काम योग्य झाले आहे की नाही हे पाहणे तुमचे काम आहे. जर कामात गडबड झाली तर बुलडोझर खाली मातीच्या जागी तुम्हाला चिरडून टाकीन, असे कंत्राटदारांना बजावले आहे’. नितीन गडकरी यांच्या या वादग्रस्त विधानवरून नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.

बेतुलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानसुद्धा उपस्थित होते. ‘देशात निधीती कमतरता नाही. भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष केले जाणार नसल्याचेही नितीन गडकरी यांनी म्हटले. पैसा हा ठेकेदारांसाठी नसून तो देशातील गरिब जनतेसाठी असल्याचे त्यांनी म्हटले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button