पुणे

कात्रजमध्ये गोडाऊनला आग लागून 50 दुचाक्या आगीच्या भक्ष्यस्थानी!

पुणे: कात्रजमध्ये एका फायनान्स कंपनीच्या गोडाऊनला आग लागून 50 दुचाक्या जळून खाक झाल्या आहेत. कंपनीकडून जप्त करण्यात आलेल्या गाड्यांचे हे गोडाऊन आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात भडकलेल्या या आगीत गोडाऊन शेजारील पावडर कोटिंगचे वर्कशॉप, गॅरेजचेही मोठे नुकसान झाले आहे. अग्नीशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे. आज (रविवार) सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास ही आग लागली होती.

घटनेची सविस्तर माहिती अशी की, कात्रजमधील मांगडेवाडीत हिंदुजा फायनान्स कंपनीचे विजया एंटरप्रायझेस नावाचे गोडाऊन आहे. त्या ठिकाणी हप्ते न भरलेल्या दुचाकी जप्त करून आणून ठेवलेल्या होत्या. सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास या गोडाऊनमध्ये आग लागल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. याची माहिती अग्नीशामक दलाला दिल्यानंतर कात्रज, सिंहगड, कोंढवा आणि मध्यवर्ती अग्निशामक केंद्रातील बंब पाठविण्यात आले. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. फायनान्स कंपनीच्या कर्मचा-यांनी आठ ते दहा गाड्या बाजूला काढल्या होत्या. परंतु, सुमारे 50 दुचाकी या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.

या गोडाऊनमधील वीज पुरवठा सुरू असल्याने तो खंडित होईपर्यंत अग्नीशामक दलाला पाणी मारता आले नाही. त्यामुळे यात आणखी नुकसान झाले. गोडऊनच्या शेजारील जय गणेश एंटरप्रायझेस नावाचे पावडर कोटींगच्या वर्कशॉपचेही आगीत नुकसान झाले. यामधील एक सिलेंडर फुटल्याने आगीचा भडका उडाला. तसेच त्याच्या मागे असलेल्या गॅरेजमधील गाड्यांचेही नुकसान झाले. आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button