breaking-newsआंतरराष्टीय

काटरेसॅट ३ उपग्रहाचे २५ नोव्हेंबरला प्रक्षेपण

भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रो येत्या २५ नोव्हेंबर रोजी काटरेसॅट-३ हा पृथ्वी प्रतिमा व नकाशा निर्मिती उपग्रह प्रक्षेपित करणार असून त्यासमवेत अमेरिकेचे १३ व्यावसायिक नॅनो उपग्रह  सोडण्यात येणार आहेत.उपग्रह भारताच्या पीएसएलव्ही सी ४७ या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या मदतीने सोडण्यात येणार असून आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश  केंद्रावरून हे उड्डाण होणार आहे. २५ नोव्हेंबरला सकाळी ९.२८ वाजता हे प्रक्षेपण अपेक्षित असून हवामान प्रतिकूल राहिल्यास ते लांबणीवर पडू शकते.

काटरेसॅट हा प्रगत उपग्रह असून त्याच्या मदतीने अधिक सुस्पष्ट छायाचित्रे घेता येतील. ५०९ किमीच्या कक्षेत तो पाठवण्यात येणार असून पीएसएलव्ही सी ४७ प्रक्षेपकाचे हे २१ वे उड्डाण आहे. पीएसएलव्ही एक्सएल या नव्या प्रक्षेपकात सहा घन इंधन मोटारी आहेत. पीएसएलव्ही सी ४७ आणखी १३ व्यावसायिक नॅनो उपग्रह घेऊन झेपावणार आहे, ते सर्व अमेरिकेचे आहेत. श्रीहरिकोटा येथून होणारे हे ७४ वे उड्डाण असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button