breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

काँग्रेस- राष्ट्रवादीच्या ‘या’ प्रमुख उमेदवारांसाठी ‘राज ठाकरे’ घेणार जाहीर सभा

मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचा पराभव करण्यासाठी जाहीर सभा घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याचाच भाग म्हणून राज ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी प्रमुख शहरात सभा घेणार आहेत. मात्र, या सभा आघाडीच्या व्यासपीठावरून नाही तर मनसेच्या व्यासपीठावरून घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मनसे लोकसभा निवडणूक लढविणार नाही. पण मोदी-शहांसारख्या हुकुमशाही प्रवृत्तींना सत्तेतून हटविण्यासाठी राज्यभर प्रचार करणार असल्याचे राज यांनी म्हटले होते. राज यांचा मागील दोन-तीन वर्षातील मोदी- शहाविरोध पाहता व आता भाजपविरोधात सभा घेण्याचे जाहीर केल्याने त्यांच्या भूमिकेचा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला फायदा होणार आहे. विशेष राज ठाकरे आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या मतदारसंघात जाऊन मोदींना पराभूत करण्याचे आवाहन करणार आहेत.

नाशिक- समीर भुजबळ
उत्तर-पश्चिम मुंबई- उर्मिला मातोंडकर
ईशान्य मुंबई- संजय दीना पाटील
उत्तर मध्य मुंबई- प्रिया दत्त
कल्याण- बाबाजी पाटील
ठाणे- आनंद परांजपे
पुणे- मोहन जोशी
मावळ- पार्थ पवार
बारामती- सुप्रिया सुळे
सातारा- उदयनराजे भोसले
सोलापूर- सुशीलकुमार शिंदे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button