breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार या आठवड्यात राजीनामे देतील’

सोलापूर, –  ‘काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार या आठवड्यात राजीनामा देतील आणि भाजपमध्ये प्रवेश करतील,’ असा दावा महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. चंद्रकांत पाटलांच्या या दाव्यामुळे आघाडीच्या गोटात खळबळ माजली आहे.

‘काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाचा आत्मविश्वास खचला आहे. ते राजीनामा देवून हातपाय गाळत आहेत. त्यामुळे त्यांचे आमदारही आता राजीनामा देतील. निवडणुकीला सहा किंवा त्यापेक्षा जास्त महिने बाकी असताना राजीनामा दिला तर पोटनिवडणूक होते. पण आता तर निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर आली आहे. त्यामुळे या आठवड्याभरात अनेक आमदार राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करतील,’ असा दावा चंद्रकात पाटील यांनी केला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button