breaking-newsराष्ट्रिय

काँग्रेस-जेडीएसचे चार, भाजपचा १ आमदार बेपत्ता

बंगळुरू: कर्नाटकातील सत्तासंघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना संध्याकाळी ४ वाजता विधानसभेत बहुमत सिद्ध करायचं आहे. बहुमत मिळवण्यासाठी भाजपची धावाधाव सुरू असतानाच, आता  काँग्रेस आणि जेडीएसचे चार आमदार ‘गायब’ झाले आहेत. काँग्रेस आणि जेडीएसचे प्रत्येकी दोन आमदार शपथ घेण्यासाठी विधानसभेत पोहोचलेच नाहीत. तर भाजपचा एक आमदारही बेपत्ता असल्याचे म्हटले जात आहे.

कर्नाटक विधानसभेतील बहुमत चाचणीला अवघे काही तासच उरले आहेत. सर्वच पक्षांचे आमदार शपथ घेण्यासाठी विधानसभेत पोहोचले. मात्र, जेडीएस आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन आमदार अद्याप विधानसभेत पोहोचले नाहीत. त्यामुळे ते बहुमत चाचणीवेळी मतदान करतील की नाही, याबाबत शंका आहे.

‘भाजप आमच्या आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सर्वच पाहत आहेत’, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विरप्पा मोईली यांनी केला. आमच्या पक्षाचे सर्व आमदार पक्षालाच मतदान करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button