breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

काँग्रेसच्या वर्धापनदिनाला भाजपा नेत्यासह पदाधिकाऱ्यांची हजेरी

पुणे |महाईन्यूज|

राष्ट्रीय काॅंग्रेसच्या १३५ वर्धापनदिनाला भारतीय जनता पार्टीचे खासदार गिरीश बापट यांंनी पक्षाच्या महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांना बरोबर घेत सोमवारी सकाळी थेट काँग्रेस भवनात हजेरी लावली. प्रेम नसले तर नसू द्या पण वैर नको, ही पुण्याची खरी संस्कृती आहे, असे म्हणत बापट यांनी काँग्रेसला शुभेच्छा दिल्या.

खासदार बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बीडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह भाजपा नगरसेवक, कार्यकर्ते यांचा भला मोठा ताफाच काँग्रेस भवनमध्ये हजर झाला. शहराध्यक्ष रमेश बागवे यांंनी सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर हास्यविनोदाची मैफलच बापट व बागवे यांनी जमवली. त्यांना बीडकर, मोहोळ व काँग्रेसकडून अविनाश बागवे, रमेश अय्यर, अजित दरेकर, रवींद्र माळवदकर वगैरे मंडळींनी साथ दिली.

खासदार बापट म्हणाले, पक्ष कार्यकर्ते पक्षासाठी काम करत असतात. ते करताना मतभेद होतातच, पण ते वैचारिक असावेत. पुण्यात हे नेहमी पाळले जाते. तीच पुण्याची संस्कृती आहे. वेगवेगळ्या पक्षांमध्ये असलो तरी आपण एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होतो ते असेच कायम राहिले पाहिजे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button