काँग्रेसच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभागाच्या वतीने नेहरूनगर येथील आंबेडकर नगर वसाहतीमध्ये निशुल्क रक्त व दन्त तपासणी शिबीर घेण्यात आले. यामध्ये शेकडो नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.
रिलीफ फाउंडेशन प्रकल्प व्यवस्थापक आशा भट्ट यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या शिबिरात रितुजा कड, भाग्यश्री कोरडे, शंकर सोनावणे, निलम लांडे, डी. वाय. पाटिलच्या डॉ. पुजा, विकास पवार, राजू पाटोले यांचे सहभाग घेतला. यावेळी अनेक नागरिकांच्या रक्त व दन्त तपासण्या निशुल्क करण्यात आल्या.
शहर काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष उमेश बनसोडे आणि त्यांचे सहकारी पार्वती बनसोडे, सन्मुख आयगुळे, अर्जुन गायकवाड ह्या सर्वांच्या वतीने शिबिराचे संयोजन करण्यात आले. तसेच, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोकराव मोरे आणि त्यांचे सहकारी अशोक मंगल, हर्षदा चांदुरे, मिताली चक्रवर्ती आदी उपस्थित होते.