पिंपरी / चिंचवड

काँग्रेसच्या पर्यावरण विभागातर्फे जवाहरलाल नेहरुंना आदरांजली

पिंपरी – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाच्या वतीने भोसरी औद्योगिक परिसरात माजी पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिम्मित रविवारी (दि. २७) आदरांजली वाहण्यात आली.

सर्वप्रथम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे उपाध्यक्ष दिलीपसिंग मोहिते आणि माजी नगरसेविका निगार बारस्कर ह्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. चिमुकल्या ४ वर्षीय आयुवीर ह्याने गुलाबाचे फुल चाचा नेहरू यांना अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी निगार बारस्कर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभाग उपाध्यक्ष दिलीपसिंग मोहिते, महासचिव अशोक मंगल, महासचिव अमर नाणेकर, सचिव अशोक काळभोर, प्रवक्ता आयुष मंगल, पिंपरी-चिंचवड काँग्रेस पर्यावरण विभाग अध्यक्ष उमेश बनसोडे, उपाध्यक्ष गुरुदेव लक्ष्मण वैराळ, शहर काँग्रेस सचिव एस. टी. कांबळे, श्वेता मंगल, नेहा मंगल, आयुवीर मंगल, अक्षांश मंगल, के. के. राव, रावसा अर्नाळ, सुनील पवार, सोनी श्रीवास्तव, गगन भूल, अमृत बहादूर, भीमाशंकर सरगुंडी, सुरेश कानिटकर, नवनाथ भोसले आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button