breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सरदार बुटासिंह यांचे निधन

नवी दिल्ली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सरदार बुटासिंह यांचं शनिवारी दीर्घ आजाराने निधन झालं आहे. ते 86 वर्षाचे होते.बुटासिंह हे माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक होते. बुटा सिंह यांच्या निधनावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही शोक व्यक्त केला आहे.बुटा सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री, कृषी मंत्री, रेल्वे मंत्री, क्रीडा मंत्री आदी पदे भूषवितानाच बिहारचे राज्यपाल आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्षपदही सांभाळलं होतं.

बुटासिंह गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. दीर्घ आजारामुळे आज (२ जानेवारी) त्यांचं निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर आजच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. २१ मार्च १९३४ मध्ये पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील मुस्तफापूर गावात बुटा सिंग यांचा जन्म झाला होता. ते ८ वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. बुटासिंह हे माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक होते. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बुटा सिंग काँग्रेसमध्ये सामील झाले होते.

तर, त्यानंतर त्यांनी इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या कॅबिनेटमध्ये महत्त्वाची खाती सांभाळली. राष्ट्रीय राजकारणात सक्रीय राहतानाच दलितांचे नेते म्हणूनही त्यांनी त्यांची ओळख निर्माण केली होती. ते १९७८ ते १९८० या काळात काँग्रेसचे महासचिव होते. यानंतर ते भारताचे गृहमंत्री झाले. मात्र, डॉ. मनमोहन सिंग यांचं सरकार येताच त्यांना बिहारचे राज्यपाल करण्यात आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button