breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

काँग्रेसचा बालेकिल्ला आणखी मजबूत… खराळेतील सरपंचपदाच्या उमेदवार सुलभा बनसोंडे यांचा भाजपला रामराम!

शिराळा । शिराळा तालुक्यातील उखुळ-मणदूरपासून बिउरपर्यंतचा पट्टा म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. हा बालेकिल्ला आणखी मजबूत करण्यासाठी युवा नेते सत्यजित देशमुख यांनी कुशल रणनिती आखली आहे. त्याद्वारे ठिकठिकाणच्या गावांतून विरोधी पक्षातील पदाधिकारी-कार्यकर्ते काँग्रेसच्या छताखाली आणण्याचा धडाका लावला आहे.

खराळे, ता. शिराळा येथील भाजप पक्षाचे सरपंचपदाचे उमेदवार सुलभा बनसोंडे व भाजप पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भैरु तात्या बनसोंडे याच्यांसह २५-३० कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला. यावेळी काँग्रेसचे नेते हनमंत पाटील बापु खाराळे व काळुद्रें गावातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते, अशी माहिती ‘एनएसयुआय’चे माजी जिल्हा उपाध्यक्ष योगेश कुलकर्णी यांनी दिली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे युवा नेते सत्यजित देशमुख यांनी तयारी सुरू केली आहे. गावोगावी कार्यकर्त्यांची मोट बांधून विरोधकांना आव्‍हान देण्याची रणनिती आखली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button