breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

कल्याण-डोंबिवलीत मनसेला धक्का; पालिकेतील गटनेत्याचा भाजपात प्रवेश

डोंबिवली – सोमवारी दिल्लीत अर्थसंकल्पाची धामधूम सुरु असताना मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शिवसेना प्रवेशाची रेलचल पाहायला मिळाली. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या डोंबिवलीतील बड्या कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधले. तर शिवसेनेपाठोपाठ आज भाजपानेही मनसेला मोठा धक्का दिला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते आणि गटनेते मंदार हळबे यांनी आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. दरम्यान, काल डोंबिवलीतील मनसेचे माजी शहराध्यक्ष तसेच प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी कार्यकर्त्यांसह सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेनेत प्रवेश केल्याने मनसेला डोंबिवलीत धक्का बसला होता.

वाचा :-मनसेला खिंडार, ‘या’ बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

दरम्यान, राजेश कदम, मंदार हळबे या सारख्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देणे, हा मनसेसाठी एक मोठा धक्का आहे. राज ठाकरे यांच्या विश्वासातील नेते म्हणूनही ते ओळखले जायचे. मात्र त्यांनी राजीनामे का दिले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु कल्याण-डोंबिवलीत मनेसतंर्गत सर्वकाही आलबेल नसल्याचे यावरुन स्पष्ट होते. महत्त्वाचे म्हणजे राजेश कदम हे स्थापनेपासून मनसेसोबत होते. तर मंदार हळबे यांनी २०१९मध्ये मनसेच्या तिकीटावर डोंबिवलीतून विधानसभेची निवडणूक लढवली होती. भाजपाच्या रवींद्र चव्हाण यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button