breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कर आकारणीसाठी नवीन मिळकती, वाढीव आणि अनधिकृत बांधकामांची पालिकेकडून होणार पाहणी

  • कर संकलन विभागाच्या सहायक आयुक्त स्मिता झगडे यांची माहिती

पिंपरी ! महाईन्यूज ! प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील नवीन मिळकती, वाढीव बांधकामे आणि अनधिकृत बांधकामांची पाहणी केली जाणार आहे. मिळकतधारकांनी आपला मिळकतकर त्वरीत भरून घ्यावा. अन्यथा त्यांच्यावर जप्तीची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती कर संकलन विभागाच्या सहायक आयुक्त स्मिता झगडे यांनी दिली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन बांधकामांची संख्या वाढत आहे. तर, वाढीव बांधकामे आणि अनधिकृत बांधकामे देखील मोठ्या प्रमाणात आहेत. या बांधकाम मालकांनी अनधिकृत बांधकाम नियमित होणार असल्याचा शासनाने आदेश काढल्यामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून पालिकेचा मिळकत कर भरलेला नाही. आता पालिका प्रशासनाकडून अशा बांधकामांची पाहणी करण्यात येणार आहे. ज्या मिळकतधारकांनी कर भरला नाही, त्यांच्याकडून कर वसूल केला जाणार आहे.

कर संलकन करण्यासाठी पालिकेच्या वतीने एक स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. उद्या सोमवार (दि. 18)पासून हे पथक शहराच्या विविध भागात फिरून वाढीव बांधकामे, अनधिकृत बांधकामांची पाहणी करणार आहे. त्यामुळे थकीत मिळकत धारकांनी आपल्या मिळकतीचा कर त्वरीत भरावा, अन्यथा जप्तीची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती झगडे यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button