breaking-newsराष्ट्रिय

कर्नाटक विधानसभेत भाजपकडून राष्ट्रगीताचा अवमान

बंगळुरू: आज कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाआधीच भाजप नेते येडियुरप्पांनी राजीनामा दिला. पण त्यानंतर राष्ट्रगीत सुरू असतानाच येडियुरप्पा, भाजपचे आमदार आणि कर्नाटक विधानसभेच्या सभापतींनी विधानसभेतून निघून जाऊन राष्ट्रगीताचा अवमान केला. यामुळे सगळीकडून भाजपवर टीका होते आहे.

कर्नाटकामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला पण त्याला बहुमत मिळालं नाही. तरीही भाजपने राज्यपालांकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली. पण सुप्रीम कोर्टाने येडियुरप्पांना शनिवारी दुपारी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सगळे आमदार कर्नाटक विधानसभेत जमले. यावेळी आमदारांच्या शपथविधीनंतर येडियुरप्पांनी भाषणही दिले. हे भाषण झाल्यानंतर प्रथेप्रमाणे राष्ट्रगीत सुरू झाले. पण राष्ट्रगीताच्यावेळी स्तब्ध उभे राहून राष्ट्रगीताला मान न देता येडियुरप्पांनी भाजप आमदारांसह सभात्याग केला.

राहुल गांधींनीही राष्ट्रगीताच्या या अवमानावर सडकून टीका केली आहे. भाजप आणि संघ भारतातली संस्थाचं महत्त्व संपवू पाहत आहेत आणि म्हणून आम्ही त्यांच्याविरूद्ध लढत आहोत असं त्यांनी सांगितलं.तसंच अशा चुका भाजप आणि संघ वारंवार करत असतं असंही ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button