breaking-newsराष्ट्रिय

कर्नाटक विधानसभा निवडणूक : ‘लिंगायत समाजाचा भाजपला कौल’

बंगळूरू : कर्नाटकात लिंगायत मतदारांचा प्रभाव असलेल्या मतदारसंघात भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे. लिंगायत मतदारांचा प्रभाव असलेल्या २९ जागांवर भाजप आघाडीवर आहे. लिंगायत मते निर्णयाक असलेल्या मतदारसंघात काँग्रेस ९ आणि जनता दल सेक्युलर सहा जागांवर आघाडीवर आहे. कर्नाटकात काँग्रेस, भाजपा आणि जनता दल सेक्युलर या पक्षांचा प्रचार विकास आणि भ्रष्टाचार या मुद्यांभोवती फिरत होता.

दरम्यान, कर्नाटकात सर्वात मोठी व्होटबँक असलेल्या लिंगायत समाजाची मतं वळविण्यासाठी काँग्रेसने लिंगायत समाजाला अल्पसंख्यक समाजाचा दर्जा दिला होता. त्यामुळे लिंगायत समाजाची मते काँग्रेसला मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण काँग्रेस अपयशी ठरल्याचं कर्नाटकच्या निकालावरून स्पष्ट झालं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button