breaking-newsराष्ट्रिय
कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षांचा राजीनामा
बेंगळुरू – कर्नाटक प्रदेश कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष एस आर पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला उत्तर कर्नाटकात चांगले यश न मिळाल्याने त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला आहे. उत्तर कर्नाटकात जर कॉंग्रेसला जादा जागा मिळाल्या असत्या तर पक्षाने स्वबळावर राज्यात सरकार स्थापन केले असते असे ते म्हणाले.
आपण पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे काही दिवसांपुर्वीच इमेलने राजीनामा दिला आहे पण त्यांनी तो अजून स्वीकारलेला नाही असे ते म्हणाले. उत्तर कर्नाटकात कॉंग्रेसला फक्त आठच जागा जिंकता आल्या आहेत. आपण पदाचा राजीनामा दिला असला तरी आपण कॉंग्रेस पक्षातच राहणार असून पक्ष देईल ती जबाबदारी आपण स्वीकारू असे त्यांनी एक प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.