breaking-newsराष्ट्रिय

कर्नाटकात ६ जूनला मंत्रिमंडळाचा विस्तार

नवी दिल्ली : कर्नाटकात सरकार स्थापन केल्यानंतर आठवड्याभरापासून मंत्रिमंडळाचा लटकलेला विस्तार ६ जून रोजी होणार आहे. मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी ही घोषणा केली. खातेवाटपावर सहमती झाल्यानंतर पुढच्या वर्षी होणारी लोकसभा निवडणूकही काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर (जेडीएस) एकत्र मिळून लढणार असल्याची घोषणाही उभय पक्षांनी केली. काँग्रेसला २२, तर जेडीएसला १२ खाती मिळाली आहेत.

२२४ आमदारांच्या कर्नाटक विधानसभेत काँग्रेसचे ७८, तर जेडीएसचे ३७ असे एकूण ११७ आमदार आहेत. आमदारांच्या संख्याबळानुसार मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटप करण्यात आले आहे. काँग्रेसचे नेते अशोक गेहलोत, अहमद पटेल आणि गुलामनबी आझाद तसेच कर्नाटक काँग्रेसचे प्रभारी के. सी. वेणुगोपाळ यांची मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत झालेल्या वाटाघाटीत खातेवाटप निश्चित करण्यात आले. मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि उपमुख्यमंत्री परमेश्वर यांनी मंत्र्यांच्या शपथविधीची तारीख निश्चित करण्यासाठी राज्यपाल वजूभाई वाला यांची भेट घेतली.

गृह, सिंचन, बेंगळुरू शहर विकास उद्योग आणि साखर उद्योग, आरोग्य, महसूल, नगरविकास, ग्रामीण विकास, कृषी, गृहबांधणी, वैद्यकीय शिक्षण, समाजकल्याण, वन व पर्यावरण, खाण आणि भूगर्भविज्ञान, महिला आणि बालकल्याण, अन्न आणि नागरी पुरवठा, हज, वक्फ आणि अल्पसंख्यांक कल्याण, विधी आणि संसदीय कामकाज, विज्ञान आणि तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, युवक कल्याण आणि कन्नड संस्कृती, बंदरे आणि अंतर्गत वाहतूक विकास अशी २२ महत्त्वाची खाती काँग्रेससाठी सोडण्यात आली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button