breaking-newsराष्ट्रिय

कर्नाटकात ‘सिधा रुपया’ सरकार- पंतप्रधान

बंगळूरू : कर्नाटक विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी कंबर कसून तयारी केली आहे. दोन्ही पक्षांकडून आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टीका करत मतदारांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. कर्नाटकात सिद्धरामय्या सरकार नाही तर सिधा रुपया सरकार आहे असा आरोप त्यांनी केला. तसेच लाच म्हणून पैसे दिल्याशिवाय इथे कोणतेही काम होत नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

बंगळूरू हे देशातले आयटी हब मानले जाते. मात्र, कर्नाटक सरकारने हे गुन्हेगारांचे शहर बनवले असाही आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. दादागिरी आणि गुंडगिरीची संस्कृती काँग्रेसला या ठिकाणी राबवायची आहे. इथली परिस्थिती हाताळण्यात आणि गुन्हेगारी कमी करण्यात काँग्रेस सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. राजधानी दिल्लीनंतर बंगळूरू हे असे शहर आहे जिथे गुन्हेगारीचे प्रमाण २८ टक्क्यांनी वाढले आहे असाही आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणूक १२ मे रोजी रंगणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button