breaking-newsराष्ट्रिय

कर्नाटकमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या…

विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान 
बंगळूर – कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार गुरूवारी समाप्त झाला. त्या राज्यात आता विधानसभेच्या 223 जागांसाठी 12 मे (शनिवार) यादिवशी मतदान होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.एस.येडियुरप्पा आणि इतर नेत्यांमुळे प्रचार रंगतदार ठरला. प्रचारावेळी प्रतिस्पर्धी पक्षांच्या नेत्यांवर बोचरी टीकाही झाली. भ्रष्टाचार, जातीयवाद, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा विदेशी वंश, सिद्धरामय्यांचे तब्बल 70 लाख रूपयांचे महागडे घड्याळ, वादग्रस्त खाणसम्राट रेड्डी बंधूू आणि त्यांच्या निकटवर्तीयांना भाजपने दिलेली तिकिटे आदी मुद्‌द्‌यांवरून प्रचार चांगलाच तापला. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात बनावट मतदार ओळखपत्रांच्या मुद्‌द्‌यावरूनही जोरदार चिखलफेक झाली.

कर्नाटकमध्ये कॉंग्रेस, भाजप आणि जेडीएस अशी तिरंगी लढत रंगणार आहे. त्या राज्याची सत्ता मिळवण्यासाठी प्रामुख्याने कॉंग्रेस आणि भाजपमध्ये कॉंटे की टक्कर अपेक्षित आहे. कुणालाच स्पष्ट बहुमत न मिळून त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील जेडीएस किंगमेकर बनण्याची शक्‍यता आहे. कर्नाटकची सत्ता कुणाकडे याचा फैसला 15 मे यादिवशी होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button