breaking-newsराष्ट्रिय

कर्नाटकमध्ये कॉंग्रेसला आघाडीची शक्‍यता

मात्र एकहाती सत्ता मिळणार नाही 
जनमत कौल चाचण्यांचा अंदाज

नवी दिल्ली – कर्नाटकामध्ये कोणता पक्ष सरकार स्थापन करणार याचा निर्णय 15 मे रोजी होईल. पण त्यापूर्वीच कॉंग्रेससाठी खूशखबर आली आहे. लोकनीती-सीएसडीएस आणि एबीपी न्यूजच्या सर्वेनुसार या निवडणुकीत कॉंग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. पण कोणत्याही पक्षाला एकहाती सरकार स्थापन करता येणार नाही.

मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांच्या कामकाजावर नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या सर्वेनुसार कॉंग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. कॉंग्रेसला 92 ते 102 जागा मिळण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. भाजपा 79 ते 89 जागा तर जेडीएसला 32 ते 42 जागा मिळू शकतात. कॉंग्रेस पक्षाला 38 टक्के, भाजप 33 टक्के आणि जेडीएस+ 22 टक्के मते मिळतील असा अंदाज या सर्वेमध्ये आला आहे.

कर्नाटकात 12 मे रोजी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी या सर्वेद्वारे कर्नाटकातील जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 27 एप्रिल ते 3 मे दरम्यान हा सर्व्हे करण्यात आला. 56 विधानसभा मतदारसंघांमधील 244 बूथवर जाऊन 4 हजार 929 मतदारांचे मत जाणून घेण्यात आले.

कोणत्या पक्षाला किती जागा? 
कॉंग्रेस : 92 ते 102 जागा
भाजप : 79 ते 89 जागा
जेडीएस : 32 ते 42 जागा
इतर : एक ते सात जागा

कोणत्या पक्षाला किती टक्के मतं?
कॉंग्रेस : 38 टक्के
भाजप : 33 टक्के
जेडीएस+ : 22 टक्के

मोदी सरकारचं कामकाज कसं आहे?
खुप चांगलं : 23 टक्के
चांगलं : 45 टक्के
वाईट : 16 टक्के
अत्यंत वाईट : 12 टक्के

कर्नाटकातील सिद्धरमैय्या सरकारचे काम कसे आहे?
खुप चांगलं : 29 टक्के
चांगलं : 43 टक्के
वाईट : 15 टक्के
अत्यंत वाईट : 10 टक्के

सर्वात भ्रष्ट पक्ष कोणता?
कॉंग्रेस : 41 टक्के
भाजप : 44 टक्के
जेडीएस : 4 टक्के

लिंगायत समाजाची मतं कुणाला?
कॉंग्रेस : 18 टक्के
भाजप : 61 टक्के
जेडीएस : 11 टक्के

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button