breaking-newsराष्ट्रिय

कर्नाटकमध्ये आतापर्यंत 67 कोटींची रोकड जप्त

निवडणुकीदरम्यानच्या कारवाईत कोट्यवधींच्या वस्तूही हस्तगत 
नवी दिल्ली – विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या कर्नाटकमध्ये निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या देखरेख पथकांनी आतापर्यंत तब्बल 67 कोटी 27 लाख रूपयांची रोकड जप्त केली. याशिवाय, मद्य, सोने-दागिने आणि इतर वस्तू मिळून हा आकडा 120 कोटी रूपयांच्या वर गेला आहे.

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीसाठी 12 मे यादिवशी मतदान होईल. निवडणुकीदरम्यान मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी त्यांना विविध प्रकारची प्रलोभने दाखवली जातात. मतदारांमध्ये पैशांचे आणि वस्तूंचे वाटप करण्याचे प्रकारही बऱ्याचदा पुढे येतात. अशा प्रकारांना आणि काळ्या पैशांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने देखरेख पथके नेमली आहेत. त्या पथकांनी विविध ठिकाणी कारवाई करून रोकड आणि इतर वस्तू मिळून 152 कोटी रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

त्यातील 32 कोटींची रोकड योग्य छाननीनंतर संबंधितांना परत करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात 23 कोटी रूपयांचे मद्य आणि 43 कोटी रूपयांच्या सोने आणि दागिन्यांचा समावेश आहे. याशिवाय, प्रेशर कुकर, साड्या, शिवणयंत्र, गुटखा, लॅपटॉप आणि काही वाहने मिळून 18 कोटी रूपयांच्या वस्तूही हस्तगत करण्यात आल्या. सुमारे 39 लाख रूपयांच्या अंमली पदार्थांच्या जप्तीची माहितीही सुत्रांकडून देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button