breaking-newsराष्ट्रिय
कर्नाटकमधील मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा कायम
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकमधील मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा अद्याप कायमच आहे. मुख्य मंत्री म्हणून एच् डी कुमारस्वामी आणि उपमुख्य मंत्री म्हणून कॉंग्रेसचे जे परमेश्वर यांचा शपथविधी होऊन चार दिेवस होऊन गेलेले आहेत. मात्र अद्यापपर्यंत खात्यांच्या वाटपाबाबत अथवा मंत्रिमंड्सळाच्या विस्ताराचा काहीही निर्णय घेण्यात आलेले नाही. कर्नाटकमध्ये भाजप हा सगळ्यांत मोठा विरोधी पक्ष आहे.
सोनिया गांधी सध्या उपचारांसाठी अमेरिकेला गेल्या असून कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी हे सध्या त्यांच्यासोबत अमेरिकेत आहेत. आणि राहूल गांधी अमेरिकेहून परत येत नाहीत, तोपर्यंत म्हणजे आणखी 4-5 दिवस तरी कर्नाटक मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकणार नाही. आणि खात्यांचे वाटपही होऊ शकणार नाही, असे सूत्रांनी कळवले आहे.