breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कर्तव्यदक्ष वाहतूक पोलीस कर्मचारी आबासाहेब सावंत यांच्या पाठीवर आयुक्तांकडून कौतुकाची थाप

पिंपरी / महाईन्यूज

वाहतूक पोलीस कर्मचा-याला बोनेटवर घेऊन मोटार पुढे दामटत असताना वाहनचालकाला चौतुर्याने थांबवून ताब्यात घेतल्याने वाहतूक पोलीस कर्मचारी आबासाहेब सावंत यांच्या पाठीवर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी कौतुकाची थाप दिली आहे.

चिंचवड वाहतुक विभागांतर्ग येणा-या अहिंसा चौक येथे विनामास्क वाहनचालकांवर पोलीस कर्मचारी पोना ८२१ आबासाहेब विजयकुमार सावंत हे कारवाई करीत होते. दरम्यान, एमएच ०१ वाय ८८३७ या क्रमांकाची फियाट उनो वाहन चालक युवराज हनुवते याने मास्क घातलेला नव्हता. हे पाहून सावंत यांनी त्याला थांबण्यासाठी इशारा केला. परंतु, त्याने त्यांच्याकडे जाणीवपुर्क दुर्लक्ष करुन वाहन बाजुला न करता पुढे दामटले. परंतु, चालकास वाहनाचा अडथळा आल्याने त्याला पुढे निघुन जाता आले नाही. तेव्हा सावंत यांनी वाहनाच्या पुढे जाऊन बॉनेटवर हाथ ठेवुन वाहन बाजुला घेण्यास सांगितले. परंतु, चालक वाहन बाजुला घेत नव्हता.

चालकांनी वाहन रेस करत सावंत यांना मागे नेत वाहन रेटत होते. अशा स्थितीत सदर वाहन चालकाने चारचाकी अंदाजे ५० मिटरपर्यंत रेटली. परिस्थिती पाहुन त्यांचे सहकारी कर्माचारी हे त्यांच्या मदतीला आहे. त्यांनी चालकाला समजावत वाहन बाजुला घेण्यास सांगत होते. परंतु, तो वाहन बाजुला घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. वाहनचालकाशी बोलत असतानाच अचानक चालकाने वाहन एक्सलरेट करुन पुढे पळविले. त्यामुळे समोर उभे असलेले पोना सावंत यांच्या गुडघ्याला इजा झाली व ते बोनेटवर पडले. त्यामुळे त्यांचे उजव्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली.

परंतु, चालकाने त्याकडे दुर्लक्ष करुन वाहन एल्पो कंपनी ते चाफेकर चौक मार्गे पिएन जी ज्वेलर्सपर्यंत अंदाजे ८०० मिटर अंतर सावंत यांना कारच्या बोनेटवर बसलेल्या स्थितीतच वाहन पळविले. त्यादरम्यान आजुबाजुच्या लोकांनी, रिक्षा चालकांनी दुचाकी स्वारांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, चालक कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितित नव्हता. तेव्हा त्याचा पाठलाग करणा – या दोन दुचाकीस्वारांनी पुढे जाणा-या झायलो गाडीस रस्त्याच्यामध्ये थांबवुन वाहन थांबविण्यास भाग पाडले.

त्यानंतर पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई केली. या घटनेमध्ये सांवत यांच्या जिवितास धोका निर्माण झाला होता. परंतु, त्यांनी धाडसाने कर्तव्यदक्ष राहुन प्रसंगावधान राखुन स्वतःचा बचाव केला. पोलीस नाईक सावंत यांनी प्रसंगावधान ठेऊन पोलीस दलाचे कर्तव्याप्रती निष्ठा राखली. त्यांनी केलेल्या मनोधैर्य वाढविणा-या कामगिरिबदल पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश व अपर पोलीस रामनाथ पोकळे यांनी त्यांचा सन्मान केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button