breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

कर्करोगाच्या ४२ औषधांच्या किमतींवर नियंत्रण

राष्ट्रीय औषध नियंत्रण प्राधिकरणाचा निर्णय

मुंबई : कर्करोगावरील महागडय़ा ४२ औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपनीला विक्रीवर ३० टक्क्यांपर्यंतच नफा कमावण्याची मर्यादा राष्ट्रीय औषध नियंत्रण प्राधिकरणाने घातली आहे. याबाबतची अधिसूचना प्राधिकरणाने बुधवारी प्रसिद्ध केली.

विक्रेत्यांकडून घेत असलेली किंमत आणि प्रत्यक्ष रुग्णाला औषध खरेदी करताना द्यावी लागणारी किंमत यात तफावत आहे. ती लक्षात घेऊनच नफ्यावर नियंत्रण आणण्यासाठी ‘ट्रेड मार्जिन रॅशनलायझेशन’ पद्धतीने औषधांच्या किमतींवर नियंत्रण आणण्यात येणार आहे.

प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणाऱ्या पहिल्या टप्प्यात शेडय़ुलव्यतिरिक्तच्या कर्करोगाच्या औषधांवर नियंत्रण आणले आहे. या निर्णयांतर्गत औषधनिर्मिती कंपन्यांना ३० टक्क्यांपर्यंतच नफा कमावण्याची मर्यादा असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे. हे र्निबध ८ मार्चपासून लागू होतील. त्यानुसार औषधनिर्मिती कंपन्यांनी घाऊक विक्रेत्यांसाठीची खरेदी किंमत आणि प्रत्यक्ष रुग्णांकडून आकारण्यात येणारी किंमत आधीच ठरवावी अशी सूचना प्राधिकरणाने दिली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारतात कर्करोगाचे १५ लाख रुग्ण आहेत. २०१८ मध्ये कर्करोगाचे ८ लाख रुग्ण दगावले आहेत. २०४० पर्यंत रुग्णांची संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे. कर्करोगाच्या उपचाराचा खर्च इतर आजारांच्या तुलनेत अडीच पटीने अधिक आहे. त्यामुळे त्यावरील औषधे परवडणाऱ्या दरात मिळणे अत्यावश्यक आहे. ती मिळाली, तर उपचार वेळेत होतील या उद्देशाने हे नियंत्रण आणले गले आहे.

अत्यावश्यक औषधांच्या यादीत कर्करोगावरील ५९ औषधांचा समावेश असून यांच्या किमतीवर प्राधिकरणाने मर्यादा घातली आहे. या व्यतिरिक्त केंद्रीय आरोग्य विभागाच्या समितीने विस्तृत अभ्यास करून सुचविलेल्या ४२ कर्करोगावरील औषधांच्या किमतीवर र्निबध आणण्यात आले आहेत. औषधनिर्मिती कंपन्यांना ३० टक्क्यांपर्यंत नफा आकारून औषधे विकावी लागतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button