breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कपड्यात गुंडाळून अर्धवट पुरलेलं, पंचनामा करुन खोदलं, तर निघालं कुत्रं

पिंपरी |महाईन्यूज|

देहूगाव – म्हाळुंगे रस्त्यावर पांढ-या कपड्यात गुंडाळून संशयास्पद पुरल्याची खबर सर्वत्र वा-यासारखी पसरली. पोलिस व महसूल यंत्रणेकडून पंचनामा केला. त्यानंतर खोदाई मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यात कुत्रं असल्याचं आढळून आलं. त्यावर डोंगर पोखरुन उंदीर निघाला, त्यावर पोलिसासह महसूल कर्मचा-यांना हसावं की रडावं हेच कळेनासे झाले होते. दरम्यान, पोलिस व महसूल यंत्रणेने दाखविलेल्या तत्परतेचे काैतूक होत आहे.

पोलिसांनी सांगितले की, काल (शनिवारी) सात वाजण्याच्या सुमारास जुन्या देहूगाव म्हळुंगे रस्त्याच्या कडेला संशयास्पद पुरल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावर देहूरोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक मनिष कल्याणकर, त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या पाहणीत सदर खड्ड्याच्या कडेला महिलेचा स्कार्प व टॉवेल दिसला. त्यामुळे पोलीसांचा संशयही बळावला होता.

त्यांनी रात्रभर दोन पोलीस कर्मचारी तेथे बंदोबस्तासाठी ठेवले. सदर घटनेची माहिती महसुल विभागाला कळविण्यात आली. त्यांच्याशी याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला. यानंतर आज(रविवार) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारा महसुल विभागाचे प्रभारी नायब तहसिलदार अंकुश आटोळे, प्रभारी मंडल अधिकारी जी.एफ.सोमवंशी, तलाठी अतुल गीते, पोलीस निरिक्षक मनिष कल्याणकर, पोलीस उपनिरिक्षक छाया बोरकर, देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी रणजीत कांबळे हे घटनास्थळी आले. पोलीसांनी या सर्वांच्या समोर घटनास्थळाचा पंचनामा केला. 

त्यानंतर सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सदरचे खोदकाम करण्यात आले. खोदलेल्या खड्ड्यात पांढऱ्या कपड्यात पोमॉलीन जातीचे कुत्रे असल्याचे आढळून आले. या खड्ड्यात गाडलेले कुत्रे असल्याचे निदर्सनास आल्यावर उपस्थितांना हसावे की रडावे अशी अवस्था झाली होती.

पोलीस निरिक्षक मनिष कल्याणकर म्हणाले की, ठिक आहे, खड्यात कुत्रे मिळाले कोणतीही अनुचित घटना घडलेली नव्हती. अन्यथा एखादा मोठा गुन्हा घडला असता तर त्याचा सर्वांनाच त्रास झाला असता. असे असले तरी या घटनेची पोलीस व महसुल विभागाने ताबडतोब दखल घेतल्याचे दिसून आले आणि तत्पर सेवेची व कार्यक्षम प्रशासन असल्याचे सप्रमाण दाखवून दिल्याने परिसरात चांगलीच चर्चा रंगली होती.
 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button