breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कठुआ, उन्‍नावची हरियाणात पुनरावृत्ती

नवी दिल्‍ली :  जम्‍मूतील कठुआ आणि उत्तर प्रदेशमधील उन्‍नाव सामुहिक बलात्‍कार घटनेमुळे देश हादरून गेला असतानाच हरियाणातील यमुनानगर येथे १३ वर्षाच्या अल्‍पवयीन मुलीवर चौघांकडून सामुहिक बलात्‍कार करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुन्‍हा एकदा समाजात तीव्र असंतोष व्‍यक्‍त होत आहे. अल्‍पवयीन मुलीवर चौघांकडून बलात्‍कार करून तिचे डोके भिंतीवर अपटून तिची हत्या करण्याचा प्रयत्‍न झाला. मुलीच्या कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोक्‍सो कायद्यातंर्गत त्या चौघां विरोधात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित अल्‍पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यानंतर पोक्‍सो ॲक्‍टनुसार गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या घरचे बाहेर असताना तिचे अपहरण करून तिच्यावर बलात्‍कार करण्यात आला आहे.  त्या संशयित चार जणांनी अल्‍पवयीन मुलीवर बलात्‍कार करून तिचे डोके भिंतीला आपटून तिची हत्‍या करण्याचा प्रयत्‍न झाला आहे. यामध्ये मुलगी बेशुध्द पडली होती. काही वेळानंतर मुलीने घरी येऊन ही घटना कुटुंबियांना सांगितली.   चार जणांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असून त्या नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button