breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कट्टरपंथीयांना बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण देणारा जेरबंद

मुंबई | महाईन्यूज

  • पुणे सनबर्न महोत्सवात घातपात घडविण्याच्या कटातही सहभागी

कट्टरपंथीयांना बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण देणारा आणि पुण्यातील सनबर्न या पाश्चात्त्य संगीत महोत्सवात घातपाताच्या कटात सहभागी असलेला आरोपी जुदिष्टीर हाजरा ऊर्फ प्रताप हाजरा (३४) याला राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पश्चिम बंगालमधून अटक केलेली आहे.ऑगस्ट २०१८मध्ये नालासोपारा येथून वैभव राऊत, तर पुण्यातून सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकर या कट्टरपंथीयांना गजाआड केलेले आहे.

राऊतच्या निवासस्थानी आणि गोदामातून गावठी बॉम्ब, स्फोटके, रसायने, बॉम्ब तयार करण्याचे अन्य साहित्य मोठय़ा प्रमाणावर हस्तगत करण्यात आले होते. या तिघांच्या अटकेनंतर एटीएसने राज्यभर छापे घालून १२ जणांना अटक केलेली आहे. चौकशीत या कट्टरपंथीयांच्या गटाने विचारवंतांचे हत्यासत्र घडविण्यासोबत अनेक ठिकाणी घातपाताचे कट आखलेले होते, अशी माहिती पुढे आली. २०१७मध्ये पुणे येथे आयोजित सनबर्न या पाश्चिमात्य संगीत महोत्सवात घातपात घडविण्याचा कट या गटाने सातारा येथील बैठकीत आखलेला होता. या कटात हाजराही सहभागी होता, अशी माहिती आरोपींच्या चौकशीतून समोर आली होती. त्यानंतर एटीएसकडून हाजरा याचा शोध सुरू केला होता.

एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालच्या २४ परगणा जिल्ह्य़ात राहणाऱ्या हाजरा याने अटकेत असलेल्या कट्टरपंथीयांच्या गटाला बॉम्ब बनविण्याचे, शस्त्र हाताळण्याचे प्रशिक्षण दिले होते. या गटाने आखलेल्या बहुतांश कटांत तो सहभागी होता. मात्र ऑगस्ट २०१८मध्ये नालासोपारा येथे राऊतच्या घरावर छापा पडल्याचे लक्षात येताच तो पसार झाला. दोन वर्षांनी त्याचे अस्तित्व पश्चिम बंगालमधील उस्टी या गावात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बंगालचे विशेष कृती दल, स्थानिक पोलिसांच्या मदतीने हाजरा याला सोमवारी अटक करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button