breaking-newsराष्ट्रिय

कंबोडियात हिंदू धर्माचा ‘पाचवा धाम’ ?

नवी दिल्ली : दक्षिणपूर्व आशियात सनातन धर्म लोकप्रिय करण्याचे प्रयत्न गतिमान झाले आहेत. यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा थेट सहभाग नसला तरीही या प्रयत्नांना संघाचे समर्थन असल्याचे सांगण्यात येते. सनातन धर्मासाठी कार्यरत कुमारनस्वामी 30 मे रोजी कंबोडियात मोठा कार्यक्रम आयोजित करणार आहेत.  कंबोडियाच्या अंकोरवाटमध्ये सनातन धर्माचा उत्सव साजरा करून पाचवा धाम निर्माण करण्याची सुरुवात केली जाईल. अंकोरवाट मंदिरानजीक हा कार्यक्रम होणार आहे.

अंकोरवाटला हिंदूंचे पाचवे धाम म्हणून विकसित करण्याची मोहीम याद्वारे चालवली जाणार आहे. भारत आणि कंबोडिया यांच्यातील संबंध अत्यंत जुने आहेत. कंबोडिया बौद्धबहुल देश असला तरीही तेथील लोक अद्याप हिंदू परंपरांचे पालन करतात. अंकोरवाट समवेत अनेक ठिकाणी हिंदुत्व आणि भारतीय स्थापत्यकलेचा प्रभाव दिसून येतो.

सनातन धर्माच्या लोकांना पाचवे धाम उपलब्ध करणे आणि जगाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न याद्वारे केला जाणार आहे. हिंदू धर्माचे चारही धाम भारतात असून पाचवा धाम कंबोडियात विकसित करणे आणि त्याचे महत्त्व जगापर्यंत गेल्याने प्रयत्नामुळे सनातन धर्म अधिक लोकांपर्यत पोचेल. हिंदू संस्कृतीचा वारसा राखणारे एक केंद्र तेथे निर्माण होईल. आगामी पिढय़ांना सनातन धर्माबद्दल ज्ञान देण्यासाठी हे पाचवे धाम महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असा दावा आयोजकांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button