breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

कंगनाच्या विषयावर बोलू नका, मातोश्रीचे प्रवक्त्यांना आदेश

मुंबई | कंगना विरुद्ध शिवसेना शाब्दिक युद्ध सुरु असताना मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली आहे. कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम दाखवत पालिकेने त्यावर हातोडा चालवला आहे. मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे नेते कंगनाच्या विरुद्ध आक्रमक होत असताना पाहायला मिळाले आता मात्र कंगनावर न बोलण्याचे आदेश मातोश्रीने त्यांच्या नेत्यांना दिले आहेत.

कंगनाच्या विषयावर बोलू नका असं मातोश्रीवरुन पक्षनेते आणि नवनियुक्त प्रवक्त्यांना सक्त आदेश आले आहेत. कंगनाच्या कार्यालयाच्या पाडकामावर न बोलण्याचा आदेश देण्यात आला आहे. मुंबई मनपाची कारवाई सूडबुद्धीने होत असल्याचा भाजपने आरोप केला आहे. कंगना प्रकरणावर मात्र शिवसेनेचे मौन धरलं आहे.

अभिनेत्री कंगना काही तासात मुंबईत दाखल होणार आहे. शिवसेना आणि कंगना यांच्यातील वाद आता आणखी तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत. कंगनाने मुंबईचे पीओके असे वर्णन केले होते. त्यानंतर, शिवसेना आणि कंगनामध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले. कंगनाला मात्र शिवसेनेची पंगा घेणं महागात पडलं आहे. बीएमसीने कंगनाच्या कार्यालयावर आज कारवाई केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button