breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘औषधी उद्यान’ : आमदार लांडगेंच्या लढ्याला अभिनेता सयाजी शिंदेंची ‘साथ’

‘त्या’ जागेवर लावलेली झाडे वाचवण्यासाठी सर्वकाही करणार

‘एमआयडसी’च्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचे संकेत

पिंपरी | प्रतिनिधी

भोसरीतील ‘औषधी उद्यान’ वाचवण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी लढा सुरू केला. त्याला आता निसर्गप्रेमी प्रसिद्धी अभिनेता सयाजी शिंदे यांनी साथ दिली आहे.  

संबंधित झाडांची लागवड करण्यात आली. ती झाडे आता मोठी झाली आहेत. त्यांचे रक्षण करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत. तसेच, प्रसंगी एमआयडीच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाणार आहोत, अशी भूमिका अभिनेता शिंदे यांनी घेतली.

पिंपरी-चिंचवडच्या सार्वजनिक आरोग्याच्या हिताचा प्रकल्प असलेल्या ‘औषधी उद्यान’ ला वाचवण्यासाठी महापालिका प्रशासनाने ‘एमआयडीसी’ प्रशासनानेही सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यापार्श्वभूीवर अभिनेता सयाजी शिंदे यांनी बुधवारी महापालिका भवनात संबंधित अधिकारी आणि ‘निमा’ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

यावेळी भाजपाचे प्रदेश सचिव अमित गोरखे, नगरसेविका अनुराधा गोरखे आदी उपस्थित होते.

निमा संस्थेचे उद्योगमंत्र्यांना निवेदन…

दरम्यान, शहरातील वनीकरण अबाधित रहावे. वनऔषधी उद्यान रहावे यासाठी पालिकेने एमआयडीसीला कळवून दुस-या जागेचा वापर कमर्शियल स्पेससाठी करावा अशी मागणी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) या संस्थेने केली आहे. महाराष्ट्र उद्योग मंत्र्यांना त्याबाबत संस्थेने सविस्तर निवेदन दिले आहे. तसेच वनऔषधी उद्यानाच्या बचावासाठी पर्यावरणवादी व सेवाभावी संस्थांनी पुढकार घ्यावा असे आवाहन, निमा संस्थेचे सचिव डॉ. अभय तांबिले यांनी केले आहे.

संबंधित जागेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न…

पिंपरी-चिंचवड महापालिकेने २००९ साली वनीकरणासाठी राखीव ठेवलेल्या मोकळ्या जागांमधून निमाला भोसरी येथील एक एकर जागा वनीकरण व वृक्षारोपणासाठी २१ वर्षाच्या कराराने दिली होती. महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये याबाबत २७ फेब्रुवारी २००८ रोजी ठराव झाला होता. ही जागा अत्यंत उंच सखल अशी होती. डम्पिंग ग्राउंड म्हणून वापरली जात होती. त्यावर संस्थेच्या सदस्यांनी मेहनत घेत साडेचारशे आयुर्वेदिक वृक्षांची लागवड करत उद्यान फुलविले आहे. झाडे आता सात ते आठ फूट उंचीची झाली आहेत. मात्र, एके दिवशी काही व्यक्तींनी येवून जागा एमआयडीसीने विकली असल्याचे सांगत जागेवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा)चे सचिव डॉ. अभय तांबिले यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button