breaking-newsताज्या घडामोडी

औरंगाबाद-पुणे बस प्रवास होणार हायटेक, 100 इलेक्ट्रिक बस धावणार -एसटी महामंडळाची घोषणा

औरंगाबाद | औरंगाबाद आणि पुणे मार्गावर धावणाऱ्या बसची संख्या दुप्पट केली जाणार आहे. एसटी महामंडळाने शुक्रवारी केलेल्या घोषणेनुसार, यात 100 अतिरिक्त इलेक्ट्रिक बस जोडल्या जाणार आहेत. एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक अरुण सिया यांनी पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली.

त्यांनी सांगितल्याप्रमाणे, सध्या या मार्गावर 50 सामान्य बस आणि तेवढ्याच संख्येने एसी आणि इतर बस चालवल्या जातात. त्यामध्येच 100 इलेक्ट्रिक बस वाढवल्या जात आहेत.

अरुण सिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, “महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून दररोज 5 हजार लिटर डीझेल वापरले जाते. इलेक्ट्रिक बस आल्यास इंधनाची बचत करण्यास मदत होईल.” या विशेष बससाठी औरंगाबाद आणि पुणे या ठिकाणी चार्जिंग पॉइंट ठेवले जाणार आहेत. या चार्जिंग पॉइंटवर एकाचवेळी 8 बस चार्ज केल्या जाऊ शकतील.

सिया यांनी सांगितल्याप्रमाणे, या सर्वच बस खासगी ऑपरेटर्सच्या माध्यमातून चालवल्या जाणार आहेत. तसेच चार्जिंग पॉइंटवर एका महिन्यात काम सुरू केले जाईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button