breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘औद्योगिकनगरी’ पिंपरी-चिंचवडचा रहिवाशी असल्याचा मला अभिमान!

भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या भावना

महापालिका वर्धापनदिनानिमित्त शहरवासियांना दिल्या शुभेच्छा

पिंपरी । प्रतिनिधी

महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर अशी ओळख असलेल्या औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडचा मी रहिवाशी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे, अशा भावना भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ३८ वा वर्धापन दिन (स्थापना दिवस) रविवारी साधेपणाने साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने आमदार लांडगे यांनी ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे शहरवासीयांशी संवाद साधला.

आमदार लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ३८ वर्षांच्या वाटचालीमध्ये स्व. अण्णासाहेब मगर यांच्यापासून शहराच्या विकासाला सुरूवात झाली. प्रथम महापौर ज्ञानेश्वर लांडगे यांच्यापासून विद्यमान महापौर उषा उर्फे माई ढोरे यांच्यापर्यंत अनेक महापौर, नगरसेवक, स्थायी समिती चेअरमन, विरोधी पक्षाचे नेते यांचे योगदान आहे. तसेच, आतापर्यंतचे सर्व महापालिका आयुक्त, अधिकारी, आजी- माजी पदाधिकारी, कर्मचारी यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. विशेष म्हणजे, शहरात विविध जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. कष्टकरी, चाकरमानी लोकांनी या शहराच्या विकासात भरच घातली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वर्धापन प्रतिवर्षी उत्साहात साजरा केला जातो. मात्र, यावर्षी देशावर, राज्यावर आणि आपल्या शहरावर कोरोनाच्या संकटाचे सावट आहे. गेले सहा-सात महिने आपण सर्वजण संघर्ष करीत आहोत. किंबहून कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिक आणि प्रशासन काम करीत आहे. या लढाईत आपण अनेक जवळच्या लोकांना गमावले आहे. या संकटाच्या काळात प्रत्येक गरजवंताला मदत करण्यासाठी आपण सूजान नागरिक म्हणून पुढाकार घेतला आहे. यापुढील काळात शहराची वाटचाल अधिक झपाट्याने होईल. यात शंका नाही, असा विश्वासह आमदार लांडगे यांनी व्यक्त केला आहे.

सर्वपक्षीय नेत्यांनाही दिल्या शुभेच्छा…

पिंपरी-चिंचवडच्या विकासात आजवर सर्वपक्षीय नेत्यांनी योगदान दिले आहे. या शहरातील नागरिकांना पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रत्येत पक्षातील नेत्यांनी आपआपल्यापरीने काम केले आहे. सर्वसामान्य नागरिकाला केंद्रबिंद मानून लोकप्रतिनिधींनी विकासात योगदान दिले आहे. काही कामांना दिरंगाई निश्चित झाली. पण, विकासाच्या दृष्टीने प्रत्येकाने भूमिका ठेवली आहे.

नगरसेवक जबाबदारीने काम करताहेत…

प्रत्येक प्रभागातील नगरसेवकाने आपल्या सोयी-सुविधांबाबत महापालिका सभागृहात पाठपुरावा करावा. यासाठी नागरिकांनी आपल्याला निवडून दिले आहे. या भूमिकेतून महापालिकेतील सर्व नगरसेवक जबाबदारीने काम करीत आहेत. शहरात वाढणारी लोकसंख्या आणि त्या अनुषंगाने वाढणाऱ्या समस्या- अडचणी सोडवण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक योगदान देत आहेत. शहरातील नागरिकांच्या सूचनांचाही विकासकामांमध्ये समावेश केला जात आहे, असा विश्वासह आमदार लांडगे यांनी पिंपरी-चिंचवडकरांना दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button