breaking-newsआंतरराष्टीय

ऑस्ट्रेलियातल्या 3 लाखांहून अधिक युजर्सचा डेटा लीक; फेसबुकविरोधात खटला दाखल

सिडनी | महाईन्यूज

३ लाख वापरकर्त्यांच्या वैयक्तिक डाटाचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून ‘फेसबुक आयएनसी’विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या वैयक्तिक गोपनीयता नियामकांकडून खटला भरण्यात आला आहे. हा वैयक्तिक डाटा राजकीय प्रोफायलिंगसाठी वापरला जाण्याची जोखीम असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.ऑस्ट्रेलियाच्या माहिती आयुक्तांनी फेडरल कोर्टात याप्रकरणी तक्रार नोंदविली आहे. फेसबुककडून ‘धीस इज युवर डिजिटल लाईफ’ नामक अ‍ॅपला वापरकर्त्यांची माहिती देऊन वारंवार खासगी गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केला जात आहे.

ऑस्ट्रेलियातील ३,११,१२७ फेसबुक वापरकर्त्यांचा वैयक्तिक डाटा सल्लागार संस्था ‘केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका’ला हस्तांतरित होण्याचा तसेच त्याचा राजकीय प्रोफायलिंगसाठी वापर होण्याचा धोका आहे, असे आयुक्तांनी सोमवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. फेसबुक आपल्या स्थापनेपासूनच खासगी गोपनीयतेच्या बाबतीत वादग्रस्त राहिले आहे. अलीकडे अमेरिका आणि युरोपीय देशांकडून त्याची वारंवार चौकशी होत आली आहे. फेसबुकने केम्ब्रिज अ‍ॅनालिटिकाला वैयक्तिक डाटा विकल्याचे प्रकरण २०१८च्या सुरुवातीला समोर आले होते. याप्रकरणी फेसबुक विरोधात अमेरिकेत खटला दाखल झाला होता.

हे प्रकरण फेसबुकने अमेरिकेच्या केंद्रीय व्यापार आयोगासोबत ५ अब्ज डॉलरचा करार करून जुलैमध्ये मिटवून घेतले होते. ऑस्ट्रेलियाच्या माहिती आयुक्त अँजेलिनी फॉक यांनी एका निवेदनात म्हटले की, ऑस्ट्रेलियात परिचालन करणाऱ्या सर्व संस्थांचा वैयक्तिक माहितीच्या बाबतीतील व्यवहार पारदर्शक आणि जबाबदार असला पाहिजे. फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर आपली वैयक्तिक माहिती आपल्याच नियंत्रणात ठेवण्यास वापरक र्ते असमर्थ आहेत, असे आमच्या निदर्शनास आले आहे. फसबुकने ई-मेलवरू न जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, आयुक्तांनी केलेल्या चौकशीस फेसबुक मागील दोन वर्षांपासून संपूर्ण सहकार्य करीत आहे. आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. अ‍ॅप विकासकांना माहिती उपलब्ध होणार नाही, अशी व्यवस्था आम्ही निर्माण केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button