breaking-newsपुणे

ऑनलाईन शुल्कवसुलीने पालिका मालामाल

  • पथारी शुल्काची 2 कोटींची रक्कम वसूल

पुणे  : शहरातील परवानाधारक पथारी व्यावसायिकांचे परवाना शुल्क महापालिकेकडून ऑनलाईन पध्दतीने वसूल करण्यात येत आहे. त्यामुळे या वसूलीतील गोंधळाला आणि हे शुल्क बुडविण्याच्या प्रकाराला आळा बसला असून गेल्या तीन महिन्यात अवघ्या 1313 पथारी व्यवासायिकांनी 1 कोटी 94 लाख 361 रूपयांचे शुल्क पालिकेच्या तिजोरीत जमा केले आहे. तर अद्यापही तब्बल 16 ते 17 हजार पथारी व्यावसायिकांची परवाना थकबाकी आणि नियमित परवाना शुल्क महापालिकेकडे जमा झालेले नाही. त्यामुळे या विभागास यंदा विक्रमी उत्पन्न मिळण्याची शक्‍यता वर्तविली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या पूर्वी या परवानाशुल्कापोटी महापालिकेस वर्षाला अवघे 40 ते 45 लाखांचे उत्पन्न मिळत होते. तर या वसूलीसाठी येणारा खर्चच 2 कोटींच्या आसपास होता.
महापालिकेकडून केंद्रशासनाच्या आदेशानुसार, शहरात शहर फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यात सुमारे 21 हजार अधिकृत पथारी व्यावसायिक असून त्यांतील सुमारे 18हजार जणांना परवाना वाटप करण्यात आले आहे. त्यानुसार, पालिकेने शहरात व्यावसायांच्या जागांचा विचार करून अ,ब, क, ड असे विभाग तयार केले असून त्यानुसार, 200 रूपयांपासून 25 रूपर्यांत पर्यंत दैनदिंन परवाना शुल्क आकारले जाते. तसेच व्यावसायिकांना ज्या दिवशी परवाना देण्यात आल्या आहे. त्या दिवसापासूनची त्याची मागील दोन वर्षांची वसूलीही पालिकेकडून केली जात आहे. ही रक्कम भरण्यासाठी महापालिकेने या व्यावसायिकांना ऑनलाईन परवाना शुल्क भरण्याची सुविधा दिली आहे. त्यामुळे पथारी व्यावसायिकांना घरबसल्या शुल्क भरता येत असून कोणत्याही वसूलीच्या त्रासाचा सामना करावा लागत नाही. त्यामुळे प्रामाणिक पथारी व्यावसायिकांकडून पथारी शुल्क नियमितपणे भरला आहे. गेल्या तीन महिन्यात सुमारे 1313 जणांनी तब्बल 1 कोटी 94 लाखांचे शुल्क भरले असून हे अवघे 5 टक्के पथारी व्यावसायिकांचे शुल्क आहे. त्यामुळे उर्वरीत व्यावसायिकांच्या शुल्कही मोठया प्रमाणात मिळण्याची शक्‍यता प्रशासनाकडून वर्तविली जात आहे.

आधी होती अवघी 40 लाखांची वसूली 
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून हे परवानाशुल्क वसूलीचे काम केले जात होते. तसेच हे परवाना दरही शहर फेरीवाला धोरणापूर्वी सध्याच्या दरांच्या तुलनेत कमी होते. त्यामुळे महापालिकेस परवाना शुल्क आणि त्याच्या थकबाकी वसूली मधून अवघे 40 ते 45 लाखांचे उत्पन्न मिळत होते.मात्र, आता शुल्कात झालेली वाढ, ऑनलाईन शुल्क वसूली, शुल्क वसूलीसाठी पथारी व्यावसायिकांना दिला जाणारा त्रास, कर्मचाऱ्यांकडून शुल्क वसूलीत केले जाणारे गैरप्रकार यांना आळा बसला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button