breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘ऑक्सिजन फ्लो’ मशीन खरेदीस विरोधामुळे पालिकेस 30 मशीन मिळणार – नगरसेवक सुलक्षणा शिलवंत

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

महापालिकेच्या भांडार विभागाने ठेकेदारास डोळ्यासमोर ठेवून थेट पद्धतीने ऑक्सिजन फ्लो मशीन खरेदी करण्याचा घाट घातला होता. त्या प्रक्रियेस राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर यांनी स्थायी समिती सभेत या खरेदीस विरोध केला. त्या ‘ऑक्सिजन फ्लो’ मशीन थेट खरेदीस विरोध केल्याने महापालिकेस 30 मशीन मिळणार असल्याचे नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांनी सांगितले आहे.

त्यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकांत म्हटले आहे की, महापालिका खरेदी करत असलेल्या ऑक्सिजन फ्लो मशिनची किंमत केवळ 90 हजार ते 1लाख 25 हजार रुपयांपर्यंत आहे अशा 130 मशीन महापालिका 2 लाख 50 हजार रुपयांना खरेदी करत असल्याचे निदर्शनास आल्याने नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांनी या खरेदी प्रक्रियेस विरोध केला. संबंधित मशीन महापालिकेने ताब्यात घेण्याआधीही आयुक्तांशी नगरसेविका शिलवंत यांनी फोन व व्हाट्सएपच्या च्या माध्यमातून या खरेदी बाबत विरोध केला होता. 24 ऑगस्ट रोजी त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना अधिकृतरित्या पत्राद्वारे याबाबत विरोध दर्शविला.

त्या पत्रास 27 ऑगस्ट रोजी आयुक्तांकडून उत्तर देण्यात आले ज्यात दरांची पडताळणी करून संबंधित ठेकेदाराकडून 130 मशीन 2 लाख 50 हजार रुपये प्रति मशीन खरेदी करणे कायदेशीररित्या योग्य असून महापालिकेच्या फायद्याचे आहे असे सांगण्यात आले. शिवाय संबंधित कंपनी 130 मशीन व्यतिरिक्त अन्य 30 मशीन मोफत महापालिकेस देणार असून त्याची पहिल्या वर्षाची आणि पाचव्या व सहाव्या वर्षाचे मेंटेनन्स आणि सर्व्हिस मोफत करून देणार असल्याची माहितीही आयुक्तांनी पत्राद्वारे नगरसेविका शिलवंत यांना कळविण्यात आली.

नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांनी खरेदी प्रक्रियेला केलेल्या प्रखर विरोधामुळे महापालिकेला 30 मशीन मोफत मिळत असून 1 कोटी 46 लाख 83 हजार 920 रुपयांचा थेट फायदा झाला असल्याचे दिसून येत आहे. काल दि 9 सप्टेंबर रोजी स्थायी समिती सभेत या विषयास मंजुरी मिळाली. यावर नगरसेविका शिलवंत यांनी संबंधित कंपनीकडून 30 मशीन ऐवजी 50 मशीन मोफत मिळाव्यात अशी मागणी केली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी आणि स्थायी समिती सदस्या म्हणून काम करत असताना शहरातील नागरिकांच्या कररूपी पैशांचा योग्य वापर व्हावा तसेच पारदर्शकरीत्या कोणतीही खरेदी व्हावी यासाठी प्रयत्न करणे हे मी माझे कर्तव्य समजते. आणि त्या उद्देशानेच ह्या विषयाला मी विरोध केला होता अजूनही महापालिकेच्या वतीने होणाऱ्या इतर चुकीच्या खरेदी प्रक्रियेबाबत वेळोवेळी आवाज उठवणार आहे.
सुलक्षणा शिलवंत धर – नगरसेविका

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button